‘या’ कारणामुळे पावसाळ्यात मासे खाणे टाळा
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मासे हे आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी असतात. त्यामुळे अनेक आहारतज्न मासे खाण्याचा सल्ला देतात. पण पावसाळ्यात मासे खाणे हे आपण कटाक्षाने टाळले पाहिजे. कारण पावसाळ्यात मासे हे आरोग्यासाठी हानिकारक असतात.
पावसाळ्यात या कारणामुळे मासे खाणे टाळा:
१) पावसाळ्यात मासेमारी बंद असते. त्यामुळे पावसाळ्यात ताजे मासे मिळत नाहीत. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते.
२) पावसाळयात गढूळ पाणी असल्याने माशाच्या अंगावर घाण जमा होते. त्यामुळे हे आरोग्यास हानी पोहचू शकतात.
३) पावसाळ्यात मासे खाल्याने कावीळ, टायफाईड, मलेरिया यासारखे आजार होण्याची दाट शक्यता असते.
४) पावसाळा हा ऋतू मासे आणि अन्य समुद्री जीवांसाठी प्रजननाचा काळ असतो. अंडी असलेले मासे खाल्याने पोटात इंफेक्शन आणि फूड पॉयजनिंग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात मासे खाणे शक्यतो टाळा.