आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजकालची मूल तासंतास मोबाईल मध्ये गेम खेळत असतात. यामुळे मूल जास्त वेळ कॉम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये घालवत असतात. यामुळे त्यांच्या डोळ्याची नजर कमी होते. पण संशोधनातून असे समोर आले आहे की दिवसातून किमान दोन तास तरी मुलांना सूर्यप्रकाशात खेळण्यास द्यावे. यामुळे त्यांच्या डोळ्याची नजर कमी होत नाही.
मूल नेहमी मोबाईल, टॅबलेट किंवा कॉम्प्युटर वर असल्याने प्रत्यक्ष सूर्य प्रकाशात त्यांचा वापर होत नाही. तसेच नेहमी पुस्तक वाचत असणाऱ्या मुलांमध्येही हीच समस्या निर्माण होते. अशा मुलांमध्ये निकट दृष्टि दोष होण्याची शक्यता असते. यामध्ये मुलांना समोरील वस्तू नीट दिसत नाही. समोरील वस्तू धूसट धूसट दिसण्यास सुरुवात होते.
मुलांमधील निकट दृष्टि दोष कमी करण्यासाठी दिवसभरातून किमान दोन तास तरी बाहेर खेळले पाहिजे. मुलांना बाहेर खेळण्यासाठी प्रोत्साहन करा. त्यांच्या सोबत जमेल तेवढा वेळ बाहेर काढा. याचा फायदा मुलांच्या डोळ्यातील नजर वाढी मध्ये जास्त होते.
याच बरोबर लहान मुलांच्या डायाटवरही लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांनाच्या जेवणात व्हिटॅमिन ए, सी आणि ई चा समावेश असणे गरजेचे आहे. जे त्यांच्या डोळ्यांसाठी खूप फायदेमंद असते. तसेच वेळो वेळी मुलांचे डोळे तपासनेही गरजेचे असते.