आरोग्यानामा ऑनलाइन टीम – संशोधकांनी पक्षघाताच्या उपचारासाठी प्रायोगिक तत्वावर एक नवीन उपचार विकसित केला आहे. हा उपचार शारीरिक हालचाली वाढविण्यासाठी आाणि मेंदूच्या पेशींना झालेल्या हानी कमी करण्यासाठी सहाय्यक ठरू शकतो. पक्षघातानंतर शरीराच्या मोटर फंक्शनला पूर्वीप्रमाणे सामान्य करण्याची अतिशय महत्त्वाचे असते. या प्रयोगात शास्त्रज्ञांनी एडीअर ब्लॉकर्सद्वारे उपचार केलेल्या उंदरांमध्ये सुधारणा दिसून आली. पक्षघाताच्या एक-दोन तासांनंतरही एडीआारब्लॉकर्स पक्षघाताचा प्रभाव रोकण्यास सक्षम दिसून आले.
उंदरांवर करण्यात आलेल्या एका अध्ययनाआधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामुळे पक्षघात पीडितांसाठी एक नवीन उपचार विकसित करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. पक्षघाताच्या स्थितीमध्ये मेंदूतील रक्ताचा प्रवाह कमी होतो. परिणामी पेशी नष्ट होऊ लागतात. अशा स्थितीत तत्काळ उपचारांची आवश्यकता असते. जपानमधील आरआरकेईएन सेंटर फॉर ब्रेन सायन्सचे शास्त्रज्ञ हिरोमू मुनाई यांच्या नेतृत्त्वाखालील चमूने हा उपचार विकसित केला आहे.