आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Obesity | लग्नानंतर (marriage) मुलाचे किंवा मुलीचे आयुष्य पूर्णपणे बदलते. नवीन जबाबदाऱ्या वाढतात. या दोघांच्याही सवयीही बदलतात. त्यांच्या शरीरातही बरेच बदल होतात. लग्नानंतर बहुतेक जोडप्यांचे वजन वाढू (Obesity) लागते, हा बदल मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त दिसतो.
अभ्यासानुसार, लग्नाच्या ५ वर्षात ८२% महिलांचे वजन ५ ते १० किलोने वाढते. शरीराच्या काही भागांमध्ये चरबी अधिक जमा होण्यास सुरवात होते, परंतु याचे कारण काय आहे हे आपल्याला माहिती आहे का?
1) पहिले कारण म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे
लग्नानंतर, नवीन जोडप्यांसाठी रात्री बाहेरच्या जेवणाचे प्रमाण अधिक वाढते. जे जवळजवळ एक वर्ष टिकते. परिणामी, त्याचा प्रभाव शरीरात दिसण्यास सुरुवात होते, ज्यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते.
2) हार्मोनल बदल
लग्नानंतर महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स बदलतात जे वजन वाढविण्यास जबाबदार असतात.
3) गर्भवती असल्यास, आपले वजन वाढते
आई होणे प्रत्येकासाठी आनंदाची बाब आहे, परंतु गर्भधारणा झाल्यानंतर वजन वाढते, परंतु भारतीय महिला आई झाल्यानंतर स्वत:ची फारशी काळजी घेत नाहीत यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक दिसून येते.
4) वय देखील एक कारण आहे
आजकाल महिलांचे लग्न २८ ते ३० दरम्यान होत आहे तर लग्नाचे योग्य वय २२ ते २६ आहे. यानंतर, महिलांच्या शरीरात बरेच बदल होऊ लागतात. अभ्यास असे म्हणते, की वयाच्या ३० व्या नंतर, मेटाबॉलिक प्रणाली कमी होते, जे वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे.
5) पुरेशी झोप
अभ्यासानुसार, ७-८ तास झोप खूप महत्वाची आहे, परंतु लग्नानंतर, व्यस्त जीवनशैलीमुळे स्त्रिया पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत, ज्यामुळे वजन वाढते.
6) ताण
लग्नानंतर होणारे बदल हाताळणे इतके सोपे नाही. ताबडतोब जबाबदारीचा ओढा तुमच्या खांद्यावर पडतो. योग्यप्रकारे काम करण्याच्या प्रक्रियेत बर्याच स्त्रिया ताणतणावाची शिकार बनतात, ज्याचा वजनावरही परिणाम होतो.
वजन संतुलित ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या
1) स्वतःसाठी वेळ काढा. वेळेवर खा आणि निरोगी खा.
2) व्यायाम करा.
3) भरपूर पाणी प्या हे मेटाबॉलिज्म मजबूत करेल आणि अतिरिक्त चरबी बर्न करेल.
4) तणावापासून दूर राहण्यासाठी आपल्या छंदाशी संबंधित कार्य करा.
Web Titel :- Obesity | why do 80 of women become fatty after marriage
Cervical Cancer | महिला का बनताहेत Cervical Cancer च्या शिकार, जाणून कसा कराल बचाव
Coconut Oil Face Mask | नारळ तेलाने बनवा हे 2 फेसमास्क, चेहऱ्याचे सौंदर्य उजळेल; जाणून घ्या