आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आयुर्वेदात तूप आणि दूध यांना खूप महत्त्व आहे. झोपण्यापूर्वी तूप दुधात घालून प्यायलं तर अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते. तसेच तूप मिश्रित दूध पिल्यास शरिराच्या अनेक मुलभूत गरजा पूर्ण होतात. जाणून घ्या दुधात तूप घालून पिण्याचे फायदे –
१) वजन कमी करण्यास उपयुक्त –
तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास रात्री झोपताना तूप मिश्रित दूध पिणे हा उत्तम पर्याय ठरु शकतो. रात्री झोपताना तूप मिश्रित दूध प्यायले तर तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्हाला लवकर भूक लागत नाही.
२) एनर्जी वाढते –
काम करताना लवकर थकत असाल तर तूप मिश्रित दूध अवश्य प्या. तूप घातलेलं दूध प्यायल्यानं शरीराला एनर्जी मिळते आणि काम करण्याचा स्टॅमिना वाढतो.
३) पचनशक्ती वाढते –
तूप मिश्रित दुधामध्ये ब्यूट्रिक अॅसिड असते. ते आपल्या शरीरातील पचनासाठी असलेले एंझाईम्स वाढवतो. जर आपली पचनशक्ती कमी असेल तर आपण रात्री झोपण्यापूर्वी हे तूप टाकलेलं दूध नक्की प्या.
४) रक्तदाब नियंत्रणात राहतो –
दूधामध्ये असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. रक्तदाब योग्य प्रमाणात असल्यास हृदयावर ताण येत नाही त्यामुळे हृदयाचे कार्य चांगले रहावे यासाठी झोपताना तूप मिश्रित दूध प्यायलेले फायदेशीर ठरते.
५) प्रतिकारशक्ती वाढते –
तूप मिश्रित दूध प्यायल्यास त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून शरीराचे संरक्षण होते. शक्यतो हे दूध कोमट असेल याची काळजी घ्यावी.
६) शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते –
शरीरातील वाईट पदार्थ बाहेर काढून शरीराला डिटॉक्स करण्याचं काम तूप मिश्रित दूध करतं.
७) पोटाच्या समस्यांवर गुणकारी –
दूध आणि तूपाचं मिश्रण मेटॅबॉलिझम चांगलं करतं आणि आपल्या शरीरातील ऊर्जा आणि पचनशक्ती वाढवतं.
बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दूधामध्ये तूप टाकून प्यावं.
८) पुरेशी झोप येण्यास उपयुक्त –
तूप मिश्रित दूध पिल्याने शांत आणि चांगली झोप लागते. प्यायल्याने शरीरातील स्नायू शिथिल होण्यास मदत होते. स्नायू शिथिल झाले की शांत आणि चांगली झोप लागते. त्यामुळे झोपण्यापूर्वी कोमट दूध पिणे गाढ झोप लागण्यासाठी उपयुक्त असते.