आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Lung | कोरोना विषाणूचा जगभरात वेगाने प्रसार होत आहे. हे टाळण्यासाठी तज्ज्ञांनी सामाजिक अंतराचे अनुसरण आणि निरोगी आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. हा विषाणू शरीरात जातो आणि फुफ्फुसांना (Lung) वेगाने खराब करतो. यामुळे फुफ्फुसांना बळकट ठेवण्यासाठी दररोज योगासने करणे आणि निरोगी आहार घेणे महत्वाचे आहे.
तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या
१) सुखासन
सुखासन केल्याने सर्व लक्ष श्वासावर केंद्रित होते. यामुळे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण अधिक चांगले होते. फुफ्फुसांच्या बळकटीमुळे त्यासंबंधित आजारांपासून सुरक्षित आहे. याशिवाय हे केल्याने मन शांत होते व तणाव कमी होतो.
फाटलेल्या टाचा काही दिवसातच होतील ‘मुलायम’, वापरा हे DIY Foot Mask
२) सेतु बंधासन
सेतु बंधासन केल्याने शरीर पुलाचे रूप धारण करते. याला इंग्रजी भाषेत ब्रिज पोझ असे म्हणतात. असे केल्याने, फुफ्फुस मजबूत होतात. फुफ्फुसांचे कार्य वेगाने वाढते. छातीत होणाऱ्या ब्लॉकेज होण्यापासून संरक्षण होते. दम्याच्या रूग्णांनी दररोज हे आसन करावे. याशिवाय हे आसन केल्याने रक्ताचा प्रवाह डोक्याकडे वाढतो यामुळे तणाव, चिंता, डोकेदुखी, निद्रानाश इत्यादीपासून आराम मिळतो.
सर्व ज्येष्ठांना व्हॅक्सीन दिल्यास देश मिळवू शकतो कोरोनापासून बचाव करण्याचे सुरक्षा कवच
३) नौकासन
नौकसान फुफ्फुसांना बळकट करते. आपल्याला श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. यासोबत या योगासनाने स्नायूंच्या ताणल्यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो. पाठदुखीचा त्रास कमी होतो.
शॉम्पू केल्याच्या दुसर्याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या
४) भुजंगासन
दररोज भुजंगासन खुल्या हवेत करा. हे हृदय, फुफ्फुस नसामधील ब्लॉकेज उघडण्यास मदत करते. यामुळे फुफ्फुसे निरोगी राहतात. हे योगासन करून मेटाबॉलिज्म सुधारला जातो. हे किडणी आणि यकृत निरोगी ठेवण्यास देखील मदत करते.
कोरोनातून बरे झाल्यावर ‘या’ गोष्टींचं चुकूनही करू नका सेवन, अन्यथा…
५) त्रिकोणासन
त्रिकोणासन केल्याने श्वासोच्छवासाच्या समस्या दूर होतात.
हे योगासन फुफ्फुस साफ करण्यास मदत करते.
पचनक्रिया सुधारून पोटाच्या समस्या कमी होतात.एकाग्रता शक्ती वाढून मन शांत होते आणि ताणतणाव कमी होतो.