आरोग्यनामा ऑनलाईन- लिपस्टिकशिवाय(lipstick) मेकअप अपूर्ण आहे. आपल्यापैकी बर्याच स्त्रिया अशा आहेत, ज्यांना लिपस्टिक लावायला आवडते, परंतु ते लावण्याचा योग्य मार्ग माहित नाही. लिपस्टिक(lipstick) लावताना आपण बर्याच चुका करतो, कारण आपल्याला लावण्याचा योग्य मार्ग माहित नसतो. जाणून घेऊ योग्य उपाय..
लिपस्टिक लावण्यापूर्वी प्रथम ओठांना स्क्रब करणे आवश्यक आहे. कारण ओठांवरील मृत त्वचा ओठांचा ओलावा काढून टाकते. ज्यामुळे ओठ कोरडे दिसू लागतात आणि ओठ सुखलेले दिसतात. म्हणून ओठांना स्क्रब केले पाहिजे
स्क्रब तयार करण्यासाठी, आपल्याला साखरेमध्ये मध आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घालावे लागेल. त्यांनी आपल्या ओठांवर चांगले स्क्रब करा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.
यानंतर ओठ नरम राहण्यासाठी पेट्रोलियम जेली किंवा लिप बाम वापरा. मग त्यांना थोडावेळ तसेच राहू द्या. यामुळे तुमचे ओठ मऊ होतील.
लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप लाइनर पेन्सिलच्या सहाय्याने ओठांवर एक रूपरेषा तयार करा आणि ओठांना आकार देऊन घ्या. आपल्या खालच्या आणि वरच्या ओठांना देखील आकार द्या. ओठांच्या वरच्या भागावर लिप लाइनर पेन्सिलच्या सहाय्याने व्ही आकार द्या आणि त्यासह आपले संपूर्ण ओठ कव्हर करा.
आता तुमच्या आवडीची लिपस्टिक लावा. यासाठी प्रथम कोपऱ्याना आणि नंतर मध्यभागी लावून घ्या. लिपस्टिक शक्यतो ब्रशच्या साहाय्याने लावा. असे केल्याने आपण लिपस्टिक चांगल्या पद्धतीने लागेल.
लिपस्टिक जास्त काळ टिकण्यासाठी टिशू पेपर घ्या. आपल्या ओठांच्या वर ठेवा आणि ब्रशच्या मदतीने आपल्या ओठांना पावडर लावा. असे केल्याने आपली लिपस्टिक व्यवस्थित लागेल आणि अधिक काळ टिकेल.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.