आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई, के मोठया प्रमाणात असतात जे आपल्या हाडांसाठी, त्वचेसाठी, आणि मेंदूसाठी उत्तम असते. परंतु यामध्ये फॅटचीही मात्रा जास्त प्रमाणात असल्याने ज्यांचे वजन आधीच वाढले आहे त्यांनी प्रमाणात तुपाचा सेवन करावा. वृद्ध लोक, हृदयाचे विकार असणारे, धूम्रपान करणारे आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी तुपाचा सेवन करणे टाळावे. जर तूप आणि लोणी यांची तुलना केली असता नेहमी तूप हेच शरीरासाठी उत्तम असते.
तुपात मिल्क शुगर लॅकटोज आणि मिल्क प्रोटीन केसीनचा प्रमाण खूप कमी असतो. तर या गोष्टी लोणीत जास्त प्रमाणात असतात. ज्यांचे वजन आधीच वाढले आहे त्यांनी लोणीचा नाही तर तुपाचा सेवन करावा. लोणीच्या सेवनाने शरीरात फॅट आजून जास्त वाढण्याची शक्यता असते.
याच सोबत तुपाचे ही आजून फायदे आहेत. डोळ्याची नजर वाढण्यासाठी, मासपेशींच्या वाढीसाठी, नस आणि हाडांच्या मजबुतीसाठी तूप हे उत्तम आहे. सर्दी झाल्यास देखील नाकात दोन तीन थेंब तुपाचे घेतल्यास चांगला फायदा होतो. या सर्व गुणांमुळे तूप हे नेहमी लोणीपेक्षा उत्तम असते.