आरोग्यानामा ऑनलाइन टीम : बदललेल्या जीवनशैलीमुळे व्यायाम करण्यासाठी वेळच नाही, अशी सबब आपल्याकडे अनेकजण सांगतात. बाहेरच्या देशातही जवळपास अशीच स्थिती आहे. परंतु, जपानसारख्या प्रगत देशात यावर एक चांगला मार्ग शोधण्यात आला आहे. येथील काही कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना व्यायामासाठी आणि झोपण्यासाठी थोडा वेळ दिला जातो. या वेळात येथील कर्मचारी व्यायाम करतात, अथवा डुलकी घेतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते.
एकाच ठिकाणी झोप आणि व्यायाम
जपानी लोक खुप कमी झोप घेत असल्याने कामाच्या ठिकाणी स्लिपिंग ब्रेक दिला जातो. यामुळे काम आणि व्यायाम एकाच ठिकाणी होऊ शकते.
अन्यथा दुखणी वाढतात
व्यायामाअभावी पचनसंस्थेचे काम बिघडणे, हायपर अॅसिडिटी, संधीवात ही दुखणी कमी वयात होतात.
जास्त कामाचा परिणाम
आपल्याकडे अनेकजण सकाळी लवकर उठून व्यायाम करत नाहीत. १४ ते १६ तास काम केल्यानंतर रात्री शतपावलीही करायलाही ऊर्जा शिल्लक राहात नाही.
Visit : arogyanama.com