आरोग्यानामा ऑनलाईन टीम : थायरॉईड ही गळ्याच्या खालच्या भागात एक लहान ग्रंथी असून, तिचा आकार फुलपाखरासारखा असतो. थायरॉईड या आजारााचे प्रमाण अलिकडे वाढत चालले आहे. विशेष करून पुरूषांपेक्षा महिलांमधील हार्मोन्स झपाट्याने बदलत असल्यामुळे थायरॉईड या आजाराचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे.
* थायरॉईड ग्रंथीचे कार्य
१ शरीराच्या चयापचयाचा वेग नियंत्रित ठेवणे.
२ चयापचयासाठी थायराईड संप्रेरकांची निर्मिती करणे.
ही आहेत कारणे
१ शरीराची प्रतिकारशक्ती आपल्याच थायराईड ग्रंथींच्या विरूध्द कार्य करून थायराईड ग्रंथीला नष्ट करते.
२ किरणोत्सराचा उपचार, विषाणूंचा परिणाम, जन्मत:च ग्रंथी नसणे.
३ आयोडिनच्या कमतरतेमुळे किंवा अधिक सेवनामुळे.
४ वाढते वय हे देखील एक कारण आहे.
५ अति ताणतणाव.
६ अनुवांशिकता.
ही आहेत लक्षणे
१ दैनंदिन कामामध्ये निरूत्साह जाणवणे.
२ कमालीचा थकवा वाटणे.
३ मलाविरोध होणे.
४ अचानक वजन वाढणे.
५ अनियमित मासिक पाळी.
६ केसांची लव अतिप्रमाणात दिसू लागणे.
७ घशाला सूज येणे.
८ संधीवात होणे.
९ हातापायांना मुंग्या येणे किंवा बधीरपणा येणे.
१० वंध्यत्व येणे.
११ विसराळूपणा वाढणे.
१२ मानसिक ताणतणाव वाढणे.
१३ केस जास्त गळणे.
१४ केस रूक्ष व रखरखीत होणे.
हे उपाय करा
१ मानसिक ताणतणाव घेवू नये.
२ नियमित योगासने करणे.
३ नियमित व्यायाम करणे.
४ या रूग्णांनी वर्षातून एकदा तरी वैद्यकीय तपासणी करावी.
५ हायपोथायराईडीसमचे निदान करण्यासाठी टी ३, टी ४ टी एसएच या तपासण्या कराव्यात.
Visit : arogyanama.com