आरोग्यनामा ऑनलाईन- सध्या आपली जीवनशैली अशी झाली आहे की, कुणीही व्यक्ती आजाराला बळी पडणे स्वाभाविक झाले आहे. जर तुम्हाला जीवनात आजाराला दूर ठेवायचे असेल आणि या आजारांपासून रक्षण करायचे असेल तर दररोज एक्सरसाइज exercise करण्याच्या सवयीचा आपल्या रूटीनमध्ये समावेश करा. यामुळे अनेक इतर सुद्धा फायदे तुम्हाला होतात. एक्सरसाइजच् exercise या त्या फायद्यांबाबत जाणून घेवूयात जे शरीराला होतात…
हे आहेत फायदे
1. ब्लड शुगर नियंत्रणात राहते. मेंदूला योग्यप्रमाणात ऑक्सीजन आणि रक्तपुरवठा होतो. स्मरणशक्ती वाढते.
2. ब्लड प्रेशर बर्यापैकी नियंत्रणात राहते. कार्डियो, योग किंवा एरोबिक्स यापैकी कोणतीही एक्सरसाइज करा.
3. इम्यूनिटी वाढते आणि आजार दूर राहतात.
4. मेटाबॉलिज्म सुधारते, बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी या समस्या दूर होतात. जास्त काळ तरूण राहू शकता.
5. वजन वेगाने कमी होते. यासाठी आहाराकडे सुद्धा लक्ष द्या. अवघ्या दोन महिन्यात 3 ते 4 किलोपर्यंत वजन कमी करूशकता.
6. तणाव आणि डिप्रेशनची समस्या दूर होते. योग आणि मेडिटेशनमुळे मेंदू शांत राहतो.
7. ब्लड कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. गुड कोलेस्ट्रॉल वाढतात. हार्ट वेगाने ब्लड पम्प करते आणि जास्त प्रमाणात ऑक्सीजन घेता.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.