आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आइस टी चे जास्त सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. विशेषत: किडनीसाठी ते खुपच धोकादायक आहे. दिवसभरात जास्त प्रमाणात आइस-टी पिणे नेहमी टाळले पाहिजे. कारण यामुळे किडनी डॅमेज होऊ शकते. अर्कांसस युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांनी ही माहिती एका संशोधनाच्या अहवालातून दिली आहे.
तसेच दिवसभरात आपल्याकडून काही चुका होतात, ज्यामुळे किडनीवर वाईट प्रभाव पडतो. योग्य वेळी या चुका सुधारल्या तर किडनी निरोगी राहते.
ही सुद्धा आहेत कारणे
१. युरिन थांबवणे
२. पाणी कमी अथवा जास्त पिणे
३. जास्त मीठ खाणे
४. जास्त मांसाहार करणे
५. जास्त जेवण करणे
६. अनावश्यक औषधे घेणे
७. सिगारेट, तंबाखू सेवन करणे
८. इन्फेक्शनकडे दुर्लक्ष करणे
९. पूर्ण झोप न घेणे
१०. जास्त थंडपेये पिणे, आदी कारणामुळेही किडनी खराब होऊ शकते.