ऑनलाइन टीम – How To Prevent Ageing | एजिंग म्हणजे वृद्धत्व ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते थांबवता येत नाही. परंतु काही गोष्टींची काळजी घेतल्यास आपण त्याची लक्षणे आपल्या त्वचेवर दिसण्यापासून टाळू शकतो आणि आपली त्वचा तरुण दिसू शकते. (How To Prevent Ageing)
आहारतज्ज्ञ आणि तज्ज्ञ सांगतात की, आहार, झोप आणि त्वचेची निगा चांगली ठेवली, तर वयाचा प्रभाव त्वचेवर फारसा पडत नाही. येथे आम्ही तुम्हाला अशाच पाच गोष्टी सांगत आहोत, ज्यांची रोज काळजी घेतल्याने तुम्ही तुमची त्वचा तरूण आणि सुंदर ठेवू शकता.
1. सूर्याच्या तिव्र किरणांपासून संरक्षण :
सूर्यापासून आपल्याला ‘ड’ जीवनसत्त्व (Vitamin D) मिळते. पण सूर्याच्या किरणांमुळे त्वचा लवकर वृद्ध दिसू लागते. यामुळे काळे डाग, पिगमेंटेशन आणि सुरकुत्या येऊ शकतात. म्हणून, SPF 30 असलेली क्रीम वापरा.
तुम्ही घरी असताना किंवा ढगाळ वातावरणात असतानाही सनस्क्रीन क्रीम लावल्याने वृद्धत्वाची लक्षणे कमी दिसतात. क्रीम लावण्याव्यतिरिक्त, पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, सनग्लासेस घाला आणि टोपी वापरा. हे तुमच्या त्वचेला सूर्यकिरणांच्या नुकसानापासून वाचवेल. (How To Prevent Ageing)
2. भरपूर झोप :
तुम्ही झोपत असताना, तुमची त्वचा स्वतःच दुरुस्त होते. झोपेत त्वचेमध्ये रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे सुरकुत्या आणि एज स्पॉट दिसत नाहीत. म्हणूनच तुम्हाला किमान 7 ते 9 तासांची झोप घेण्याचा सल्ल दिला जातो. ज्या लोकांना चांगली झोप येत नाही, त्यांची त्वचा चांगली नसते आणि अशा लोकांच्या त्वचेवर वयाचा प्रभाव लवकर दिसू लागतो.
3. हेल्दी खाणे-पिणे (Healthy eating and drinking):
तरुण त्वचेसाठी हेल्दी पदार्थ खा. हिरव्या भाज्या, भोपळी मिरची, ब्रोकोली, गाजर इ. डाळिंब, ब्लूबेरी, एवोकॅडो या फळांचाही समावेश करा.
दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टी प्या आणि सामान्य तेलाऐवजी ऑलिव्ह ऑईलचा आहारात समावेश करा.
4. मॉइश्चरायझर (Moisturizer):
वयानुसार त्वचा कोरडी होते. कोरडेपणामुळे त्वचा लवकर वृद्ध दिसू लागते.
म्हणूनच तुमच्या त्वचेला नेहमी मॉइश्चराईझ ठेवणे आवश्यक आहे.
मॉइश्चरायझर तुमच्या त्वचेत पाणी टिकवून ठेवते आणि बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसण्यापासून प्रतिबंधित करते.
तुमच्या त्वचेला व्हिटॅमिन सी (Vitamin C) असलेले मॉइश्चरायझर लावा.
5. स्किन केअर प्रॉडक्ट हुशारीने निवडा :
अँटीएजिंगच्या नावावर कोणतेही क्रीम लावू नका. त्याच्या घटकांवर एक नजर टाका.
जर क्रीममध्ये एलोवेरा जेल आणि लॅव्हेंडर ऑइल असेल तर ते तुमच्या त्वचेसाठी खूप चांगले असेल.
त्वचेमध्ये ऑक्सिजनचे मोलेक्युल्स वाढतात, ज्यामुळे वयाची चिन्हे अदृश्य होतात. त्वचा घट्ट राहते.
वयानुसार बदल करणे शक्य नसले तरी त्वचेवरील त्याचा परिणाम नक्कीच कमी होऊ शकतो.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- How To Prevent Ageing | how to prevent ageing how look young in age of 40