आरोग्यानामा ऑनलाईन टीम : ग्रीन टी आरोग्यासाठी चांगली असली तरी ती योग्य प्रमाणात सेवन करणे गरजेचे असते. एका दिवसात दोन कपपेक्षा जास्त ग्रीन टी प्यायल्यास नुकसान होऊ शकते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच असतो. त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात ग्रीन टी सेवन केल्यास विविध प्रकारचे नुकसान होते. ते जाणून घेवूयात.
होते हे नुकसान
१ डायरिया होण्याचीही शक्यता असते.
२ झोप न येण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे आणखीही काही आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३ हृदयाशी निगडीत समस्या वाढण्याची शक्यता असते.
४ पोटदुखी, अॅसिडिटी आणि लूज मोशनची समस्या होऊ शकते.
५ एनिमियाची शक्यता वाढते.
६ डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
Visit : arogyanama.com