आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आपल्याकडे प्रत्येक स्वयंपाकगृहात कांदा आढळतोच. अनेक लोक जेवणासोबतही कच्चा कांदा खातात. कांद्याचे इतरही अनेक फायदे आहेत. याच्या औषधी गुणधर्मामुळे अनेक आजारात तो गुणकारी ठरतो. कांद्यात व्हिटामिन सी, लोह, गंधक, तांबे असते. यामुळे शरिरातील शक्ती वाढते. कांद्याचे कोणते फायदे आहेत, ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ काविळ झाली असल्यास अर्धा कप सफेद कांद्याच्या रसात गूळ आणि हळद मिसळून प्यावे. तसेच छोटा कांदा चौकोनी आकारात कापून तो लिंबूच्या रसात भिजवून त्यावर मिठ किंवा काळे मिठ टाकून सेवन करा.
२ दम्याच्या रूग्णांनी कांद्याच्या रसात मध मिसळून चाटण घेतल्यास त्रास कमी होतो. खोकलाही दूर होतो.
३ मुलांना अतिसार झाल्यास कांदा बारीक करून बेंबीवर लावा. अथवा कपड्यात बांधून पोटावर लावा.
४ एखादा किटक अथवा किडा चावल्यास त्यावर कांदा कापून लावल्याने लवकर आराम मिळतो.
५ हातावर जळहळ होत असल्यास तेथे कांदा लावावा. जळजळ लगेच थांबते
६ कांद्याचा रस कानावर आणि छातीवर लावल्यास उन लागत नाही. उष्माघातापासून बचाव होतो.
७ कुत्रा चावल्यास त्या जखमेवर कापलेला कांदा मधात मिक्स करून लावा. विषाचा प्रभाव कमी होतो.
Visit : arogyanama.com