आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गर्भावस्थेत असताना बाळाच्या पोषणासाठी अनेक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. यावेळी नियमित खाण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. अगदी त्याच पद्धतीने प्रसूती नंतरही महिलांच्या खाण्या पिण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. चला जाणून घेऊ प्रसूती नंतर महिलांनी कोणत्या अन्न पदार्थांचा सेवन करावा.
प्रसूती नंतर ओट्स हे उत्तम पदार्थ मानले जाते. ओट्स मध्ये विविध पोषक तत्व असतात आणि शरीराला अवशक्य असणाऱ्या आयर्नची मात्रा वाढवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. ओट्स मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची मात्रा ही योग्य प्रमाणात असल्याने प्रसूती नंतर शरीरात व्हिटॅमिन आणि खनिजची मात्रा कमी झाल्याने ती भरून निघते.
तुम्हची प्रसूती नॉर्मल होवो किंवा सिजेरिन या दरम्यान शरीराला व्हिटॅमिन सी खूप फायदेमंद असते. व्हिटॅमिन सी ची मात्रा आंबट फळे जसे की, लिंबू , संत्रा, द्राक्षे आणि मोसंबी मध्ये जास्त प्रमाणात असते. जे पेशींना पोषण देण्यात मदत होते. याशिवाय किवी, पपई आणि स्ट्रॉबेरीचाही सेवन उत्तम असतो.
दही मध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्याने याचा सेवन ही प्रसूती नंतर महिलांना उत्तम असतो. बाळाला दूध पाजल्याने महिलांच्या शरीरातील कॅल्शियमची मात्रा कमी होते. कॅल्शियमची मात्रा वाढवण्यासाठी दही हे उपयुक्त असते. अशा वेळी तुम्ही फ्रुट दही किंवा साध्या दहीचा सेवन करू शकता.
प्रसूती नंतर महिलांनी विविध डाळांचा जेवणात समावेश करावा. त्यात जास्त प्रमाणात मसुरची डाळ हे उत्तम असते. मसूरच्या डाळांमध्ये फायबर आणि प्रोटीन सोबतच विविध प्रकारचे व्हिटामिन आणि खनिज यांचा समावेश असतो. जे पचनास ही सोपे असते.
प्रसूतीनंतर महिलांनी बदाम खाणे नेहमी खूपच चांगले असते. बदामाचे सेवन ओट्स मध्ये किंवा भिजत टाकलेले बदामही खाऊ शकता. तसेच विविध मिल्कशेक मध्ये ही बदामाचा समावेश करावा.