आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात सकाळी बनवलेल्या जेवणाला रात्री हलका दुर्गंध येऊ लागतो. असे जेवण चुकूनही सेवन करू नका. कारण यामुळे फुड पॉयजनिंग होऊ शकते. सोबतच जेवण बनवताना काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. फुड पॉयजनिंगमुळे उलटी, ताप, इत्यादी त्रास होतात. फुड पॉयजनिंगला गॅस्ट्रोएंट्रायटिस नावाने सुद्धा ओळखले जाते.
Neem Juice : जेवढं कडू तेवढंच फायदेशीर, आजारांना जवळ देखील येऊ नाही देत; जाणून घ्या
फुड पॉयजनिंगची कारणे
– शिळे, अर्धवट शिजलेले जेवण खाणे
– घाणेरड्या भांड्यात जेवण शिजवणे
– फ्रिजमध्ये ठेवलेले जेवण गरम न करता खाणे
– दूध, पनीर, दही सारखी डेयरी प्रॉडक्ट फ्रिजमध्ये ठेवू नका
* या वस्तू पसरवतात फुड पॉयजनिंग
कोणत्याही गोष्टीत बॅक्टेरिया वाढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. यासाठी ओल्या वस्तूंमध्ये फुड पॉयजनिंगचा धोका जास्त असतो.
दात किडले असतील तर अवलंबा ‘हे’ 6 नैसर्गिक उपाय, वेदनांपासून मिळेल ताबडतोब आराम
* वेळ
उन्हाळ्यात रात्री बनवलेले जेवण जर फ्रिजमध्ये ठेवले नाही तर ते सकाळी सेवन करू नका. सात तासात फुड पॉयजनिंगच्या एका बॅक्टेरियापासून 20 लाख बॅक्टीरिया तयार होतात.
उन्हाळ्यात Back Acne मुळं परेशान असाल तर ‘हे’ घरगुती उपाय करा, डाग देखील होतील ‘क्लिअर’; जाणून घ्या
* न्यूट्रिशनवाले खाद्य
अंडे, मांस, दूध, पनीर सारख्या जास्त न्यूट्रिशनवाल्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया सुद्धा लवकर पसरतो.
बचावासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
– भाज्या आणि फळे स्वच्छ धुवून खा.
– जेवण बनवण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी हात चांगले धुवा.
– मांस आणि भाज्या कापण्यासाठी वेगवेगळे चॉपिंग बोर्ड वापरा.
– कापल्यानंतर ते धुवून ठेवा.
– चपाती बनवल्यानंतर पोळीपाट आणि लाटणे स्वच्छ धुवून ठेवा.
– बाहेरच्या खाण्यासोबत मिळणारे जादा कांदा आणि चटणी खाणे टाळा.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)