आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्यामध्ये अनेक जीवजंतूंचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे आपल्याला सर्दी होते, घशात खवखव होते. तसेच आपण काही थंड पदार्थ खाल्यामुळे घशात इंफेक्शन होते. घसा खवखवत असला तर काही घरगुती उपाय केले. तर तुमचे घशाचे इंफेक्शन कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्हाला जर घशाचे झाले असेल तर तुम्ही खालील काही घरगुती उपाय करू शकता.
१) घशामध्ये खवखवण्याचा त्रास होत असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ घालून गुळण्या करा. यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळू शकेल. पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे घशामधील कफचा अडथळा कमी होतो. व गरम पाण्यामुळे कफ पातळ झाल्यामुळे बाहेर टाकणे सोपे होते. सहाजिकच त्यामुळे घशाचा दाह कमी होतो.
२) कोमट पाण्यामुळे घशाचा दाह कमी होतो. तुम्हाला कोमट पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही गरम सूप अथवा एक कप आल्याचा चहा घेऊ शकता. त्याचप्रमाणे भरपूर पाणी प्यायल्यामुळे देखील तुमचा घसा कोरडा न रहाता ओलसर राहील व तुम्हाला अधिक आराम मिळेल.
३) कोरड्या हवेमुळे घश्याला त्रास होतो. ह्यूमीडीफायरमुळे तुमच्या खोलीतील वातावरण दमट होईल. व तुमच्या घश्याला आराम मिळेल.
४) गरम पाण्याच्या वाफा घेतल्याने घशातील श्वसनमार्गाला आराम मिळतो. कधीकधी यावर कोमट पाण्याने अंघोळ केल्यास देखील बरे वाटते. अशा वेळी पाण्यात निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाकल्याने देखील पटकन बरे वाटू शकते.