आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ब्रोकोली आणि फ्लॉवर या दोन्ही एकाच प्रकारातील भाजी आहे. ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम, आयर्न, मॅग्नॅशियम, फॉस्फरस घटक फ्ल्वॉवरपेक्षा थोडे अधिक असतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन ए, सी आणि केमुबकलक प्रमाणात असतात. ब्रोकोलीमध्ये अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण देखील जास्त असते. ब्रोकोली तेलात शिजवण्यापेक्षा वाफवून खाणं अधिक फायदेशीर आहे. त्यामुळे त्यामधील पोषणद्रव्य टिकून राहण्यास मदत होते. ब्रोकोली केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
ब्रोकोली खाण्याचे फायदे –
सिजोफ्रेनिया म्हणजे विचार आणि कृती यांच्यामध्ये फरक पडणे. या मानसिक आजरात नियमित ब्रोकोलीचे सेवन करावे. त्यामुळे आजराची लक्षणे कमी होतात.
ब्रोकोलीमध्ये पोटॅशियम घटक मुबलक असल्याने हृद्यविकाराच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे.
ब्रोकोलीमध्येफायबर घटक अधिक आहेत त्यामुळे पचन सुधारायला मदत होते.
ब्रोकोली वजन घटवण्यासही फायदेशीर ठरतात.
शरीरातील रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते.
ब्रोकलीमध्ये बीटा कॅरोटीन आमि अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे घटक आवश्यक असतात.
ब्रोकलीमध्ये क्रोमियम आणि पोटॅशिअमचे प्रमाण असते. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात येते.