आरोग्यनामा ऑनलाईन- ग्रीन टी(Green Tea) आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरते. अनेकजण याचं सेवन करतात. ग्रीान टी(Green Tea) बेचव असल्यानं अनेकजण यात मध, गूळ, साखर टाकतात. काहीजण दूधही टाकतात. परंतु यात काहीही मिक्स करणं शरीरासाठी घतक ठरू शकतं. आज याचबद्ल आपण माहिती घेणार आहोत. सोबतच आपण याचे फायदेही जाणून घेणार आहोत.
ग्रीन टीमध्ये ए, डी, ई, सी, बी, बी 5, एच आणि के एवढे व्हिटॅमिन्स असातत. याशिवाय मॅग्नीज, झिंक, क्रोमियम आणि सेलेनियमसोबत अँटी ऑक्सिडेंट गुणही यात असतात. यामुळं अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी याचा फायदा होतो.
ग्रीन टीमध्ये कोणताही पदार्थ मिसळून त्याचं सेवन करू नये. तसं केलं र तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही. अनेकजण गोडवा यावा म्हणून त्यात गुळ, साखर किंवा मध टाकतात. काहीजण दूध टाकतात. असं केलं तर त्यातील पोषक घटक कमी होतात. म्हणून त्यात कधीही कोणताही पदार्थ टाकू नये. ग्रीन टी बनवताना त्यात काहीही टाकायचं नसतं हे लक्षात घ्या.
‘या’ गोष्टीही लक्षात असूद्या
– ग्रीन टी दिवसातून किती वेळा प्यावा यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या
– शक्यतो दिवसातून एकदाच ग्रीन टी प्यावा
– ग्रीन टी वारंवार उकळू नये.
– आधी पाणी उकळून घ्या नंतर त्यात टी बॅग टाका. हे केल्यावर लगेच गॅस बंद करा
– एकदा पावडर टाकल्यानंतर ग्रीन टी उकळू नका.
– ग्रीन टी बनवल्यानंतर लगेच तिचं सेवन करावं. ती तशीच ठेवू नये.
ग्रीन टीमुळं होणारे फायदे –
1) निराशा कमी होते – थेनाईन हे अमिनो अॅसिड असतं जे चहाच्या पानात असतं. निराशा कमी करण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी याचा फायदा होतो. शरीराला या अॅसिडची गरज असते.
2) हृदयरोगासाठी फायदा – यामुळं रक्तवाहिन्यांचं काम सुरळीत राहतं. रक्तदाबाचा त्रास कमी होतो. यामुळं तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते. ग्रीन टी घेतल्यानं शरीरात रक्ताच्या गुठळ्या होत नाही. यामुळं हृदयरोग किंवा अटॅकपासून दूर राहता येतं.
3) अल्जायमर आणि पार्किनसन्सवर उपयुक्त – ग्रीन टीमुळं मेंदूतील पेशी जास्त चांगल्या पद्धतीनं काम करतात. या पेशी मृत होण्याचं प्रमाण कमी होतं. खराब झालेल्या पेशींचा पुनर्संचय करण्यास ग्रीन टीचा फायदा होतो. त्यामुळं अल्जायमर आणि पार्किनसन्स होऊ नये म्हणून ग्रीन टी घेणं जास्त फायद्याचं ठरतं.
4) त्वचारोगांसाठी फायदा – वयोमानानुसार शरीरावर येणाऱ्या सुरकुत्या कमी रहाव्यात यासाठी ग्रीन टीचा खूप फायदा होतो. उन्हामुळं शरीरावर येणारे डाग कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो.
5) वजन कमी करणं – शरीरातील चयापचय क्रिया सुरळीत करण्याचं काम ग्रीन टीद्वारे केलं जातं. खाल्लेल्या अन्नाचे कॅलरीत रुपांतर होत असते. हे प्रमाण योग्य रोखण्याचं काम ग्रीन टीच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळं वाढलेली चरबी आणि वजन कमी होण्यास ग्रीन टीचा फायदा होतो.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.