आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेक महिलांना पीरियड्सच्या काळात त्रास होतो. यासाठी त्या पेनकिलरचा सुद्धा वापर करतात. मात्र, ही समस्या टाळण्यासाठी जिरे आणि गुळाचे पाणी खुपच फायदेशीर आहे. यातील पोषकतत्व पीरियड्समधील तक्रारी दूर करतात. हा उपाय कसा उपयोगी आहे, याविषयी जाणून घेवूयात.
असे तयार करा पाणी
एक चमचा गूळ, अर्धा चमचा जिरे घ्या. एका भांड्यात दोन कप पाणी टाका. यामध्ये एक चमचा गूळ आणि अर्धा चमचा जिरे टाका. हे पाणी उकळवून कोमट करून प्या. हे नाष्ट्यानंतर रोज दिवसातून एक वेळा प्यावे.
हे लक्षात ठेवा –
१) जिऱ्यामध्ये आयर्न आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याने पीरियड्स नॉर्मल राहतात.
२) गुळामधील अँटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीजमुळे पीरियड्सच्या वेदना कमी होतात. पीरियड्स नियमित होतात.
३) या दिवसांत जास्त गोड पदार्थ किंवा फास्ट फूड टाळा. यामुळे पीरियड्सची समस्या वाढू शकते.
४) रोज प्राणायाम करा. धनुरासनासारखे योग करा. यामुळे हार्मोन्सची पातळी वाढते.
५) पीरियड्समध्ये समतोल आहार घ्या. पालक आणि केळी खा.
६) दीर्घकाळ पीरियड्सची समस्या असल्यास डॉक्टरांकडे जा.