आरोग्यानामा ऑनलाइन – थंडी वाढताच सर्दी, खोकला, ताप अशाप्रकारच्या आजारांमध्ये वाढ होते. तज्ज्ञ सांगतात की, अशावेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण गरम कपडे घालतो. यामुळे शरीर बाहेरून गरम राहते, पण थंडीचा परिणाम रोखण्यासाठी शरीर आतूनही गरम राहणे आवश्यक असते. म्हणून आपण अशा पदार्थांची माहिती घेणार आहोत जे शरीराला आतून गरम ठेवतात, आणि ताकद वाढवतात.
हे आहेत ते पदार्थ
1 आयुर्वेदीक चहा
थाडीत लवंग, तुळस, काळीमिरी आणि आल्याचे सेवन केले पाहिजे. तुम्ही हे चहामध्ये टाकूनही घेऊ शकता. खोकला, सर्दी, ताप यामध्ये हे रामबाण औषध आहे.
2 मध
थंडीत मधाचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तसेच अनेक रोग दूर राहतात. अयुर्वेदात मधाला अमृत म्हटले आहे. सर्दी, तापात रात्री झोपताना एक ग्लास कोमट दुधात एक चमचा मध टाकून प्यावे.
3 बाजरीची भाकरी
थंडीत बाजरीची भाकरी खाल्ल्याने अनेक फायदे होतात. यामुळे शरीर गरम राहते. तसेच यातील प्रोटीन्स, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, फायबर आणि अँटी ऑक्सीडेंटमुळे शरीराला अनेक फायदे होतात.
4 आले
जेवणात आले वापरल्यास शरीर गरम राहते, तसेच पचनक्रिया सुधारते.
5 आवळा
आवळ्याची तुलना अमृताशी करण्यात आली आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, एबी, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, कार्बोहायड्रेट, फायबर आणि डाययुरेटिक अॅसिड असते. आवळा आणि शेंगदाणे थंडीत लाभदायक ठरतात.
6 खजूर
खजूर गरम दूधासोबत सेवन केल्यास सर्दीपासून आराम मिळतो.
7 बडीशेप
थंडीच्या दिवसात सोप खाल्ल्याने फायदा होतो. यामुळे अन्नपचन होते. जेवणानंतर सोप खाऊ शकता. बडीसोपचा काढा करूनही घेऊ शकता.
8 कोरफड
थाडीत तापमान कमी असल्याने त्वचेच्या समस्या होतात. यासाठी त्वचेवर कोरफडच गर लावावा. तयार जेलसुद्धा लावू शकता. याचा ज्यूस प्यायल्याने अनेक समस्या दूर होतात.
9 शेंगदाणे
थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाल्ल्याने शरीर गरम राहते. यामुळे रक्ताची कमतरताही दूर होत. रोज किमान 50 ग्रॅम शेंगदाणे खावेत.