आरोग्यानामा ऑनलाईन टीम : भूक लागणे, झोप येणे, कंटाळा येणे, आदीचा संकेत म्हणजे जांभई असे म्हटले जाते. जांभई येण्याचे आणखी एक कारण म्हणजे शरीरात ऑक्सिजन कमी होणे होय. असे झाल्यास मेंदूला तशा सूचना दिल्या जातात आणि आपोआप जांभई येते. परंतु, जांभई रोखण्यासाठी काही उपाय असून ते आपण जाणून घेणार आहोत.
हे उपाय करा
१ आईस टी किंवा आईस कॉफी घ्या.
२ दीर्घ श्वास घ्या. नाकातून श्वास आत घ्या आणि तोंडाद्वारा श्वास बाहेर टाका. यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
३ एसीच्या मदतीने थोडे थंड करा.
४ विनोदी व्हिडीओ पहा. हसणे हा प्रभावी उपाय आहे.
५ एक ते दोन मिनिटांसाठी डोक्यावर कोल्ड प्रेस ठेवा.
Visit : arogyanama.com