आरोग्यानामा ऑनलाईन टीम : संगणकांवर सतत काम करणे, मोबाईलचा वापर सतत वापर करणे, जास्त वाचन करणे आदी कारणांमुळे डोळ्यांवर ताण येतो. डोळे लाल होणे, जळजळ होणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे, धुरकट दिसणे यासारख्या समस्या होतात. या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत.
हे उपाय करा
१ डोळ्यांवर ताण, सूज असेल तर डोळे थंड पाण्याने धुवा.
२ गुलाब पाण्यात भिजवलेला कापूस डोळ्यांवर ठेवा.
३ थंड काकडीचे तुकडे काही काळ डोळ्यांवर ठेवल्यानेही त्यांचा थकवा दूर होतो.
४ डोळ्यांचा व्यायाम केल्याने रक्ताभिसरण नीट होते.
Visit : arogyanama.com