आरोग्यनामा ऑनलाईन- तूप प्रत्येकाच्या घरात असते. सर्व आवश्यक पौष्टिक घटक तूपात आढळतात आणि आरोग्यासाठी देखील हे फायदेशीर ठरते. तूप त्वचेसाठी(dry skin) फायदेशीर आहे हे फारच कमी लोकांना माहिती आहे. आयुर्वेदात तूप हे औषध म्हणून वापरले जाते. हिवाळ्यात त्वचा बर्याचदा कोरडी(dry skin) आणि निर्जीव होते. तूप त्वचेवर चमक आणण्यासाठी कार्य करते जाणून घ्या उपाय..
१)तुपापासून मॉइश्चरायझिंग क्रीम बनवा
तूप त्वचेला हायड्रेट आणि डागरहित बनवते, ज्यामुळे त्वचा चमकदार बनते. त्वचेला मऊ करण्यासाठी कच्च्या दुधात तूप घालावे. ते आपल्या त्वचेवर लावून हळू हळू मालिश करा. आणि ते १५ मिनिटांनंतर धुवून टाका.
२) फाटलेल्या ओठांपासून आराम मिळेल
प्रत्येकास हिवाळ्यामध्ये फाटलेल्या ओठांचा त्रास होतो. हिवाळ्यामध्ये तूप ओठांना मऊ ठेवते. झोपण्यापूर्वी ओठांवर तूप लावा आणि काही मिनिटे मालिश करा आणि रात्रभर तसेच राहू द्या.दुसर्या दिवशी सकाळी पाण्याने धुवा.
३)केसांमधील आर्द्रता टिकून ठेवते
ओलाव्यामुळे केस खराब होऊन गळू लागतात. हिवाळ्यात केसांची ही समस्या वाढते. तूपात फॅटी ॲसिड असते जे केसांमध्ये आर्द्रता कायम ठेवते. तूप केसांसाठी नैसर्गिक कंडीशनर म्हणून काम करते. १ चमचा तूप घेऊन केसांची मालिश करा आणि २ तासानंतर केस धुवून घ्या.
४)त्वचेला तरुण ठेवते
केवळ थोड्या प्रमाणात तूप वापरुन आपण तरुण दिसू शकता. रोज तुपाचा वापर केल्यास त्वचेवर वयाचा परिणाम दिसून येत नाही. तूपाचे काही थेंब घेऊन थोडावेळ त्वचेवर मालिश करा आणि काही मिनिटांनंतर धुवून टाका.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.