आरोग्यनामा ऑनलाईन टीम – एखादा पदार्थ अथवा पदार्थ आवडतो म्हणून आपण सतत त्याचे सेवन करतो. मात्र, ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कॉफीचे अनेक फायदे सांगितले जात असले तरी कॉफीचे अतिसेवन त्रासदायक ठरू शकते. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, दिवसभरात ६ कपपेक्षा जास्त कॉफी सेवन केल्यास हृदयाशी निगडीत समस्या होण्याचा धोका तब्बल २२ टक्क्यांनी वाढतो. हे संशोधन अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.
जगभरात कार्डिवस्क्युलर डिसीज म्हणजेच हृदयाशी संबंधित आजाराने मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. केवळ ऑस्ट्रेलियात प्रत्येत सहावी व्यक्ती हृदयरोगाने ग्रस्त आहे. हे संशाधन करणारे तज्ज्ञ सांगतात की, फार जास्त वेळ कॉफीचे सेवन करणे आणि हृदयरोगांचा संबंध आहे. कॅफीनच्या जास्त सेवनामुळे हाय ब्लड प्रेशरचा धोका असतो. हा हृदयासंबंधी आजारच आहे. कॉफीचे सेवन उत्तेजक म्हणून करण्यात येते. हृदय आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी कॉफीचे कमी सेवन केले पाहिजे. दिवसभरात ६ कप पेक्षा जास्त कॉफी घेऊ नये. ६ कपांपेक्षा अधिक कॉफीचे सेवन केल्यास कार्डिओवस्क्युलर सिस्टीमवर परिणाम होऊ शकतो.