‘या’ पद्धतीने चहा पिणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चहा हा सर्वांचे आवडते पेय आहे. सकाळी उठल्यानंतर अनेकांना पहिल्यांदा चहा लागतो. आपल्याला थोडं कंटाळवाणं वाटलं किंवा झोप आली कि ,आपल्याला कधीही चहाची आठवण येते. पण खूप आवडीने पिला जाणारा चहा हा आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. कारण चहामुळे आपली हाड ठिसूळ होण्याची दाट शक्यता असते.
आपण सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता अगोदर चहा घेतो. कारण चहा घेतल्यामुळे आपल्याला फ्रेश वाटत. आणि एनर्जी येते. असं आपल्याला वाटत. परंतु काहीही न खाता आणि दिवसभरात खूप वेळा चहा घेतल्याने आपल्याला स्केलेटल फ्लोरोसिस हा आजार होण्याची दाट शक्यता असते. हा आजार आपल्या हाडांना आतून ठिसूळ करते. त्यामुळे आपल्याला हाडांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
जास्त चहा पिल्याने सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. हे आपल्याला लवकर जाणवत नाही. पण नंतर याचा खूप त्रास जाणवू लागतो. त्याचबरोबर जास्त चहा पिल्याने अल्सर किंवा हायपर ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यातच आपण दूध आणि साखरेपासून जो चहा बनवतो. तो शरीरासाठी चांगला असतो. आणि त्यातच हा चहा आपण जर जेवणाच्या अगोदर किंवा जेवणानंतर लगेच घेतला. तर यामुळे आपल्या शरीराला हानी पोहचू शकते. त्यामुळे असा दुधापासून बनवलेला चहा दिवसातून तीन कप पेक्षा जास्त घेऊ नका. हा चहा घेण्यापेक्षा ग्रीन टी, हर्बल टी प्या. जेणेकरून हाडांची समस्या निर्माण होणार नाही.