आरोग्यनामा ऑनलाइन टीम : प्रेग्नंट महिलेस जिऱ्याचे पाणी प्यायला दिल्यास चांगला फायदा होतो, असे संशोधनात आढळून आले आहे. हे आई व बाळ दोघांसाठी गुणकारी आहे. एक लिटर पाणी उकाळून त्यात एक चमचा जिरे मिसळावे. हे पाणी थंड झाल्यानंतर गाळणीने गाळून घेवून नंतर प्यावे.
हे आहेत फायदे
१ रक्तदाब
या पाण्यात पोटॅशियम भरपूर असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
२ रोगप्रतिकार शक्ती
यात लोह असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच विटॅमिन ए, सी आणि अॅन्टिऑक्सिडेंट भरपूर असल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते.
३ अॅसिडिटी
गरोदरपणात महिलांना अॅसिडिटीचा त्रास होतो. हे पाणी प्यायल्यास हा त्रास दूर होतो.
४ अॅनिमिया
या पाण्याचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन वाढते.
५ जन्मदोष
गरोदर महिलेने दररोज हे पाणी प्यायल्यास बाळामधील जन्मदोषाचा धोका टाळता येतो.
Visit : Arogyanama.com