आरोग्यानामा ऑनलाईन टीम : मोबाइल, कम्प्युटर, लॅपटॉप, टीव्ही या गॅझेट्सच्या अती वापरामुळे कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हा आजार होतो. याचे सर्वात जास्त प्रमाण लहान मुले आणि तरूणांमध्ये आढळते. स्क्रीनकडे जास्त वेळ पाहत बसल्याने डोळ्यांचा हा आजार होतो. रोज २ तासांपेक्षा जास्त वेळ कम्प्यूटर, मोबाईल, लॅपटॉपवर बसल्यास कम्प्युटर विजन सिंड्रोम होण्याचा धोका वाढतो.
कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम
कोणत्याही स्क्रिनकडे एकटक बघितल्याने डोळ्यांच्या पापण्या मिटण्यास व्यक्ती विसरते. त्यामुळे डोळ्यांमध्ये सारखे पाणी येते. लॅपटॉपचा वापर करताना व्यवस्थित न बसल्यास कंबर आणि मान दुखते. डोळ्यांवर परिणाम होतो. यासाठी ब्रेक घेणे आवश्यक असते. कम्प्यूटर स्क्रिनकडे एकटक बघण्यापेक्षा काही वेळाने का होईना डोळ्यांच्या पापण्या मिटत रहावे.
ही आहेत लक्षणे
१ सतत डोकेदुखी होण.
२ काम संपल्यानंतरही धुसर दिसणे.
३ डोळ्यांतून सतत पाणी येणे.
४ डोळे दुखणे, सूज येणे.
५ डोळे कोरडे होणे.
६ डोळे लाल होणे.
७ डोळ्यांमध्ये जळजळ होणे.
८ धुसर दिसणे.
९ एकापेक्षा जास्त गोष्टी दिसणे.
असा करा बचाव
१ चष्मा असेल तर तो नियमित वापर करा.
२ चांगल्या प्रकाशातच कम्प्यूटरचा वापर करा.
३ योग्य अंतरावर ठेवून काम करा.
४ डोळ्यांत जास्त ड्राइनेस जाणवत असेल तर ल्यूब्रिकेशन आय ड्रॉप्स वापरा.
५ एक-एक तासाने ब्रेक घ्या. डोळ्यांना आराम द्या.
६ एकाच स्थितीमध्ये खुप वेळ बसू नका.
Visit : arogyanama.com