आरोग्यानामा ऑनलाईन टीम : दातांचे आरोग्य जपणे खुप आवश्यक असते. जर दातांच्या आरोग्य बिघडले तर खाण्या-पिण्याच्या समस्या निर्माण होतातच, शिवाय आरोग्यसुद्धा बिघडू शकते. पांढरे शुभ्र दात असावेत असे प्रत्येकाला वाटते, पण त्यासाठी दातांची काळजी घ्यावी लागते. दांतांच्या आरोग्याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत, त्याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
१ अॅस्प्रिनने दुखणे थांबते
– काहीप्रमाणात हे सत्य आहे. पण, हा दिलासा तात्पुरता असतो. अॅस्प्रिन हिरड्या आणि दातांना नुकसानकारक आहे.
२ दात नेहमीसाठी पांढरे रहावे
दात नेहमीसाठी पांढरे राहतील आणि ते कधीही पिवळे होणार नाहीत, असे होऊ शकत नाही. खाण्याच्या सवयी आणि लाइफस्टाइलवर ते अवलंबून आहे.
३ हिरड्यांमधून रक्त येत असल्यास ब्रश करु नये
– ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त निघत असेल तर डॉक्टरांना दाखवावे. अनेकदा काही लोक ब्रश न करण्याचा सल्ला देतात. हे चुकीचे आहे. ब्रश करणे बंद केल्यास दातांची समस्या आणखी वाढते.
४ टूथपेस्टमुळे दात चमकतील
– दातांना पांढरे करणारे गम आपल्या दातांचा पिवळा रंग दूर करतील. पण हे चुकीचे आहे. कारण टूथपेस्टमध्ये काही अशी रसायने असतात ज्यामुळे दातांचे नुकसान होते.
५ फळांमुळे दात चांगले होतात
– केळीची साल किंवा लिंबू दातांवर चोळल्यास दात चमकदार होतात, असे म्हणातात. पण, दातांवर फळांचा वापर केल्यास त्यातून एक अॅसिड तयार होते. याने दातांच्या मजबूतीवर परिणाम होतो.
Visit : arogyanama.com