आरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्ली : वृत्त संस्था: जगभर हाहाकार घालणारा कोरोना(Coronavirus) उन्हाळ्यात तग धरू शकणार नाही असं बोललं जात होतं. परंतु असं काहीही झालं नाही. उलट या काळात रुग्णसंख्या वाढत गेली. आता लवकरच थंडीचे दिवस सुरू होत आहेत. आता पुन्हा कोरोनाची(Coronavirus) दुसरी लाट येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुन्हा असं झालं तर गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.
नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संक्रमणाची दुसरी लाट हिवाळ्यात येण्याचा धोका जास्त आहे. थंडीच्या दिवसांना सुरुवात होत आहे तसं तसं युरोपताही रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावरून कोरोनाची लाट हिवाळ्यात येण्याची शक्यता आहे हे स्पष्ट आहे.
ब्रिटनमध्ये हिवाळा सुरू झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ झाली. हिवाळ्यात ब्रिटनमध्ये 1.20 लाखांपेक्षा जास्त मृत्यू होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. कोरोना व्हायरल नोव्हेंबरच्या दरम्यान चीनमधून इतर ठिकाणी पसरला होता. म्हणून आता हिवाळ्याचे दिवस जसजसे जळव येतील तसतसा संक्रमणाचा धोका वाढू शकतो असं मत काही तज्त्ज्ञाचं आहे.
हिवाळ्याच्या वातावरणात व्हायरल इंफेक्शन, फ्लूसारखे इतर आजार वाढण्याची शक्यता असते. कोरोनामुळं हे व्हायरल संक्रमण पसरत असल्यानं भीती व्यक्त केली जात आहे. परंतु आतापर्यंत कोणत्याही संशोधनातून ही बाब सिद्ध झालेली नाही. यापूर्वीच्या महामारींवर लक्ष दिल्यास समजून येतं की, स्पॅनिश फ्लू, आशियाई फ्लू, हाँगकाँग फ्लू अशा आजारांचा प्रभाव 6 महिन्यांनी कमी झाल्यानंतर पुन्हा दुसरी लाट आली होती. म्हणून कोरोनाची दुसरी लाटही येऊ शकते असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
भारतता हळूहळू सर्व काही अनलॉक होताना दिसत आहे. वाहतूक, समारंभ, सार्वजनिक ठिकाणांची गर्दीही वाढत आहे. मोठ्या प्रमाणात लोक दूरवर प्रवास करत आहेत. या कारणांमुळं कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ शकते. हवामान बदल झाल्यामुळं कोरोनाच्या प्रसारावर कसा परिणाम होईल याची कल्पना कोणालाही देता येणार नाही.
अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, हिवाळ्यात श्वासांसंबधित समस्या वाढतात. उदा महाराष्ट्रातही स्वाईन फ्लू पसरण्याची अनेक उदाहरणं सापडली आहेत. अशात कोरोनाचा प्रसारही वाढण्याची शक्यता आहे. जल, वायू या क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रीनपीस इंडियाचे अविनाश चंचल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हवा प्रदूषण वाढल्यास श्वसनासंबंधित आजार उद्भवण्याचा धोका जास्त असतो. प्रदुषणामुळं फुप्फुसं खराब होऊन कार्यक्षमता कमी होते. यातून न्युमोनिया, कोरोना असे गंभीर आजार होण्याचा धोका असतो.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.