आरोग्यनामा ऑनलाईन- लवंग(Clove) हा गरम मसाल्यातील प्रकार बहुंतांश स्वयंपाक घरात वापरला जातो. लवंगेत शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक आहेत. लवंग(Clove) रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे. लवंगेचा रोजच्या आहारात समावेश केल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
1 दोन लवंग किसून ते अर्धा कप पाण्यात घालून उकळवून थंड करून हे पाणी प्यायल्यास गॅसची समस्या दूर होते. तीन दिवस हा उपाय करावा.
2 दात खूप दुखत असल्यास कापसावर लवंगाचे तेल घेऊन ते दुखत असलेल्या दाताला लावल्यास दातदुखी दूर होईल.
3 डोकेदुखीत लवंगाच्या तेलामध्ये मीठ मिसळून कपाळावर लावल्याने आराम मिळतो.
4 सर्दी, खोकला यांसारख्या समस्या जाणवत असल्यास लवंग तोंडात ठेवून चघळत राहा.
5 लवंगेतील अँटी मायक्रोबियल गुणधर्मामुळे पिंपल्सपासून सुटका मिळते.
6 त्वचा उजळते
7 रोगप्रतिकारशक्ती वाढते.
8 लवंग चघळल्यास तोंडातून दुर्गंर्धी येण्याची समस्या दूर होते.
9 पचनक्रिया चांगली राहते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.