आरोग्यनामा ऑनलाईन- एका संशोधनानुसार स्तनाच्या कर्करुग्णांचे(Breast cancer) प्रमाण वाढले आहे. पण, दिलासादायक बाब म्हणजे या आजारामुळे(Breast cancer) होणाऱ्या मृत्यूची संख्या कमी होत आहे.
स्तनाचा कर्करोगाची लक्षणे आणि उपाय
वेगाने वाढणारा स्तनाचा कर्करोग हे भारतीय महिलांमधील मृत्यूचे मुख्य कारण आहे. स्तनाचा कर्करोग पुरुष आणि स्त्रियानाही होऊ शकतो. परंतु सामान्यत: स्त्रियांमध्ये अधिक दिसतो. संशोधनानुसार स्तन कर्करुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मृत्यूची संख्या कमी होत आहे. कर्करोग उद्भवतो जेव्हा स्तनाच्या काही पेशी असामान्यपणे वाढू लागतात आणि गाठ तयार होते. शरीराच्या इतर भागात देखील आजार पसरू शकतो.
ज्या स्त्रियांनी 30 वर्षे ओलांडली आहेत. त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. तरूणांमध्ये चरबीयुक्त यकृताचा धोका वाढत आहे. पण, सोप्या मार्गांने प्रतिबंध होऊ शकतो.
यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता
– वृद्ध व्यक्ती
– लठ्ठपणा
– मोठया वयात गर्भधारणा
– स्तनाशी संबंधित आजारांचा इतिहास
– कुटुंबातील स्तनाचा कर्करोगाचा इतिहास
– कर्करोग जीन्स
– मद्यपान
– धूम्रपान
स्तनाचा कर्करोग प्रतिबंध
जीवनात होणारे छोटे बदल स्तन कर्करोगाची शक्यता कमी करू शकतात. स्तनात काही बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर निदानामुळे रोगाचा प्रसार रोखता येतो.
स्तनाचा कर्करोग कसा रोखायचा?
-मद्यसेवन मर्यादित प्रमाणात करा
-नियमित व्यायाम करा
– वजन नियंत्रित ठेवा
-निरोगी पदार्थ खा
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.