आरोग्यानामा ऑनलाईन टीम : शरीरासाठी पाणी खुप आवश्यक असते. शरीराला जर पाणी मिळाले नाही तर माणूस जीवंत राहू शकत नाही. यावरून पाण्याचे महत्त्व अधोरेखित होते. शरीराच्या विकासात, शरीराचे कार्य सुरळीत राहण्यात पाण्याची भूमिका महत्वाची असते. कमी प्रमाणात पाणी पिण्याची सवय असल्यास अनेक आजारही होऊ शकतात. पाण्याचे विविध प्रकार आणि त्यांचे शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत पाणी पिण्याचे फायदे
१) ऊर्जा वाढवणे आणि थकवा दूर करण्यासाठी उपयोगी.
२) वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
३) इम्युनिटी सिस्टम मजबूत होते.
४) शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतात.
मिठाच्या पाण्याचे फायदे
१) पचनक्रिया चांगली राहते.
२) वजन कमी होते.
३) चांगली झोप लागते.
४) बॅक्टेरिया नष्ट होतात.
गरम पाणी पिण्याचे फायदे
१ सकाळी गरम पाणी पिल्याने पचनक्रिया संतुलित राहते.
२ वजन नियंत्रित राहते. शरीरातील तापमान वाढण्यासही मदत मिळते.
३ अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी रोज सकाळी गरम पाणी प्यावे.
४ कफ, वात आणि पित्ताची समस्या दूर होते.
५ त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.
Visit : arogyanama.com