आरोग्यनामा ऑनलाईन- मोहरीचे तेल हे कडू तेल म्हणून ओळखले जाते. मोहरीचे तेल स्वयंपाकात वापरले जाते. केवळ आरोग्यच नाही तर सौंदर्य(Beauty) वाढविण्यास मदत करते. हे तेल शरीराच्या अनेक लहान-मोठ्या समस्यांवर विजय मिळविण्यासही मदत करते. मोहरीच्या बियामधून तेल काढले जाते. मोहरीच्या साह्याने बर्याच आजारांमध्ये आराम मिळू शकेल. तेलाने आपले रूप(Beauty) सुधारू शकता. मोहरीच्या तेलाचे फायदे पाहू.
1. सुरकुत्या
मोहरीच्या तेलाने चेहर्यावरील सुरकुत्या दूर करू शकता. फक्त मोहरीच्या तेलाची मालिश करणे आवश्यक आहे. प्रथम चेहऱ्यात तेल मुरावा. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. त्याद्वारे सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.
2 मुरूम
मुरमांवर उपाय म्हणून नारळ आणि मोहरीच्या तेलाने चेहऱ्यावर मालिश करावे आणि थोडावेळ सोडा. मग स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. हे चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यास मदत करू शकते.
3.मॉइश्चरायझर
मोहरीचे तेल एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. हिवाळ्यात त्वचेमध्ये बहुतेक वेळा डँड्रफ आणि ओठ फ़ुटतात. मोहरीचे तेल घेऊन त्वचेवर लावल्यास कोरडेपणापासून मुक्तता होते.
4. डार्क स्पॉट्स
मोहरीच्या तेलाने डार्क स्पॉट कमी करता येतात. हरभरा पीठ आणि दही मोहरीच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. हे चेहऱ्यावरील डार्क स्पॉट कमी करण्यात, तसेच चेहरा चमकदार करण्यास मदत करू शकते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.