आरोग्यनामा ऑनलाईन- शरीरात सूज येणे ही सामान्य समस्या आहे, ज्यास वैद्यकीय(Ayurvedic) भाषेत इडिमा म्हटले जाते. अनेकदा ही समस्या आपोआप बरी होते, परंतु अनेकदा ही समस्या गंभीरसुद्धा होऊ शकते. शरीरात आतील किंवा बाहेरील बाजूस सूज इन्फेक्शनशिवाय अन्य कारणामुळे सुद्धा असू शकते, जे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.सूजवर आयुर्वेदिक(Ayurvedic) औषध शरीराच्या आतील किंवा बाहेरील सूज कमी करण्यासाठी करा उपाय
ही आहेत लक्षणे
शरीराच्या ज्या भागात सूज असते, त्या भागात खाज सुटणे, त्वचा कोरडी होणे, कमजोरी, ताप, पोट फुगणे, त्वच ताणली जाणे किंवा मार लागलेल्या ठिकाणी वेदना होते.
करा हे घरगुती उपाय
1 गाजराचे बी
एक ग्लास पाण्यात दोन चमचे गाजरचे बी उकळवा. नंतर ते थंड करून प्या. नियमित काही दिवस हा उपाय केल्यानंतर सूज वेगाने कमी होते.
2 लोणी
लोण्यात काळीमिरीचे चूर्ण टाकून चांगले मिसळा आणि सेवन करा. काही दिवसात सूज नष्ट होईल.
3 कच्चा बटाटा
400 ग्रॅम पाण्यात 200 ग्रॅम कच्चे बटाटे कापून उकळवा. याद्वारे सूजेवर शेक द्या. बटाट्याच्या तुकड्यांचा लेप करा.
4 टरबूजचे बी
टरबूजचे बी सावलीत सूकवा आणि ते वाटून घ्या. यानंतर एक कप पाण्यात तीन-चार चमचे टरबूतचे बी मिसळून एका तासासाठी भिजत ठेवा. दिवसात काहीवेळा याचे सेवन करा.
5 हळदीचे दूध
एक ग्लस गरम दूधात एक चमचा हळद पावडर आणि वाटलेली खडीसाखर टाकून रोज हे दूध प्या. दोन-तीन दिवसा सूज कमी होईल.
6 बार्लीचे पाणी
बार्लीमध्ये ते सर्व गुण आढळतात जे शरीरासाठी आवश्यक असतात. एक लीटर पाण्यात बार्ली उकळवून आणि थंड करून पित राहिल्यास सूज कमी होते.
7 कोथेंबिर
कोथेंबिरीची ताजी पाने आणि बी दोन्हीमध्ये सूज कमी करण्याचे गुण आढळतात. पायांवर सूज असल्यास एक कप पाणी उकळवून त्यामध्ये तीन चमचे आख्ये धने टाका. हे उकळून पाणी निम्मे होऊ द्या. आता ते गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मध टाकून दिवसात दोन वेळा प्या.
8 ऑलिव्ह ऑईल
थोड्या ऑलिव्ह ऑईलमध्ये लसण्याच्या दोन पाकळ्या कापून भाजा आणि यामधून लसूण काढून टाका. आता हे तेल पायावर लावून दोन-तीनवेळा मॉलिश करा.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.