आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बदललेली जीवनशैली, उशिरा लग्न, जास्त वयात मुलांना जन्म देणे तसेच स्तनपानामध्ये कमतरता इत्यादी कारणांमुळे महिलांना ब्रेस्ट कॅन्सरसारखा गंभीर आजार होतो. हा आजार महिलांमध्ये सध्या वाढताना दिसत आहे. ३२ टक्के महिला या आजाराने पिडीत आहेत. महिलांनी काही खास पदार्थांचा आहारात समावेश केल्यास या घातक आजाराला दूर ठेवता येणे, शक्य आहे.
१) लाल मुळा
यातील अँटीओक्सिडेंट्समुळे स्तन कॅन्सरच्या कोशिका वाढत नाहीत.
२) रताळे
यातील अँटीओक्सिडेंट्स, बीटा कॅरोटीनमुळे स्तन कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.
३्) लाल द्राक्ष
यातील अँटीओक्सिडेंट्समुळे कॅन्सर कोशिकांची वृद्धी कमी होत होते.
४) लाल डाळिंब
डाळींबाच्या दाण्यांमध्ये एरोमाटेज नावाच्या अँन्झाइमची क्रियाशीलता कमी करण्याची क्षमता आहे.
५) पत्ता कोबी
यातील इंडोल-३-कार्बिनोल नावाच्या रसायनामुळे स्तन कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी होते.
६) बीट
बीटचा काढा मल्टी-ऑर्गन ट्युमर्सची वृद्धी रोखण्यात अतिसक्षम आहे.