आरोग्यानामा ऑनलाईन टीम : पोटात गॅस होणे ही खाण्या-पिण्याशी संबंधीत समस्या आहे. चुकीचा आहार आणि चुकीच्या पद्धतीने अन्न सेवन करणे यामुळे हा त्रास होतो. यावर वेळेवर उपचार न घेतल्यास त्याचा जास्त त्रास होऊ शकतो. यावर काही घरगुती उपाय असून ते केल्यास आराम मिळू शकतो. हे घरगुती उपाय कसे करावेत ते जाणून घेवूयात.
हे घरगुती उपाय करा
1 लसूण
पाण्यात काही लसणाच्या कळ्या उकळून घ्या. यात काळे मिरे पावडर आणि जिरे घाला. हे पाणी गाळून प्या.
2 हिंग
एक ग्लास पाण्यात चिमुटभर हिंग मिसळा. दिवसातून दोन-तीनवेळा हे पाणी प्या.
3 बडीशेप
गरम पाण्यात बडीशेप मिसळून प्यायल्यास आराम मिळतो.
4 दालचीनी
एक चमचा दालचीनी पावडर गरम पाण्यात मिसळा. यात मधही टाकू शकता. हे पाणी प्यायल्याने आराम मिळेल.
5 आले
आले, बडीशेप आणि वेलची समप्रमाणात घ्या. हे पाण्यात मिसळा. एक चिमुटभर हिंग टाका. दिवसातून दोनदा हे पाणी प्या.
6 लिंबू आणि बेकिंग सोडा
एका लिंबाच्या रसात बेकिंग सोडा टाका आणि त्यात पाणी टाका. हे चांगल्याप्रकारे मिसळून हळूहळू प्या.
Visit : arogyanama.com