आरोग्यानामा ऑनलाइन टीम : कडूलिंबाची पाने, साल, खोड, फळे सर्वांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्यास आयुर्वेदामध्ये खुप महत्व आहे. प्राचीन काळापासून या वृक्षाचा विविध कारणासाठी वापर होत आहे. परंतु, याच्या अतिकडू चवीमुळे त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. पण, हे चुकीचे असून याच्या सेवनाने तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. कडूलिंबाचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ कडूलिंबाचं तेल त्वचेच्या पेशींमधील लवचिकता कायम ठेवतात.
२ पोटाच्या सर्व समस्या दूर होतात. निंबोणी खाल्ल्यास पोट साफ होते.
३ निंबोणी खाल्ल्याने रक्त स्वच्छ होते. भूकही चांगली लागते.
४ कानदुखी, कानातू पू येणे या समस्येवर कडूलिंबाचं तेल मधात मिसळून कान साफ करावा.
५ सर्दी-खोकला झाल्यास कडूलिंबाची पाने मधात मिसळून चाटण घ्यावे.
६ जर पोटात जंत झाले असतील तर याच्या पानांच्या रसात मध मिसळून चाटण घ्यावे. तसेच कडूलिंबाच्या पानात थोडं हिंग मिसळून चाटण घ्यावे.
७ त्वचा, केस निरोगी राहतात.
८ कडूलिंबाच्या सालीचा काढा बनवून प्यायल्याने सतत येणारा ताप किंवा अंगात मुरलेला ताप दूर होतो.
९ कडूलिंबाची पाने बारीक करून दही आणि मुल्तानी मातीमध्ये मिसळून पेस्ट बनवा. हा पॅक लावल्यास चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात.
१० रुग्णाला लघवी होत नसेल तर कडूलिंबाची पाने बारीक करून पेस्ट पोटावर लावावी.
११ दातांच्या आरोग्यासाठी कडूलिंब उपयुक्त आहे.
Visit : arogyanama.com