आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मनुक्यांचा उपयोग जास्त करून मिठाई बनवण्यासाठी केला जातो. मनुक्यांमध्ये लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. हे घटक आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तर मनुका भिजवून खाल्ल्यास त्याचा फायदा अनेक पटींनी वाढतो.
‘या’ पद्धतीने करा मनुक्यांचे सेवन
साहित्य – 1 ग्लास पाणी , 15 मनुके
कृती – एक ग्लास पाणी घ्या. त्यात मूठभर मनुके रात्रभर भिजवत ठेवा. दुसऱ्या दिवशी मनुके काढून खा व उरलेले पाणीही प्या.
भिजवलेले मनुके खाण्याचे फायदे –
1) भिजवलेले मनुके खाल्यामुळे आपल्या पचन संबंधी समस्या दूर होते. यात फायबर प्रचलित मात्रेत असते जे पचन करण्यास मदत करते.
2) मनुक्याच्या सेवनाने हृदयाचे आरोग्यही राखले जाते. तसेच मनुक्याच्या पाण्याच्या सेवनाने दृष्टी सुधारण्यास मदत होते.
3) भिजवलेल्या मनुक्यांत मोठ्या प्रमाणात लोह असते त्यामुळे अॅनिमियासारख्या आजारावर मनुका गुणकारी आहे.
4) एनर्जी व रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी भिजवलेले मनुके उपयोगी आहेत.