आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मेकअपमूळे तुम्ही सुंदर आणि आकर्षक दिसता. पण या मेकअपमूळेच तुम्हच्या चेहऱ्याला नुकसानही होऊ शकतो. खूप साऱ्या महिल्या नीट मेकअप नाही पुसताच झोपून जातात. यामुळे चेहऱ्यावर मुरूम, दाग होण्याची शक्यता जास्त असते. आणि चेहरा कुरूप दिसण्यास सुरुवात होते. एक्सपर्ट्स सांगतात की रात्री झोपण्याच्या आधी मेकअप न काढता झोपल्यास चेहरा खराब होण्याची शक्यता असते.
आता प्रश्न असा उपस्थित होतो की मेकअप रिमूव्ह साठी कोणती गोष्ट योग्य आहे ? बाजारात अनेक मेकअप रिमूव्हवर उपलब्ध असतात. पण यामुळे आपला चेहरा मुलायम होत नाही. म्हणून घरगुती उपाय आहे ते म्हणजे ‘बदाम तेल’. हो बदाम तेलाने तुमच्या चेहऱ्याला तजेलपणा मिळतो. बदाम तेल आपल्या चेहऱ्याला मॉचराईज करतो. बेदम तेल मेकअपला सोप्या पद्धतीने पुसून काढतो. यामुळे चेहऱ्याला कोणत्याही पद्धतीचा इजा होत नाही. आता पाहुयात बदाम तेलाचा उपयोग मेकअप रिमूव्हवर म्हणून कशा पद्धतीने करू शकता.
कापसाचा छोटासा भाग घेऊन त्यात बदाम तेलाचे २-३ थेंब टाका. आता या कापसाने संपूर्ण चेहरा नीट पुसून काढा. यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की कापसाने चेहरा हळुवारपणे पुसा जास्त जोर नका लावू. या बदाम तेलामुळे मेकअप तर पुसला जातो त्याचबरोबर चेहरा मुलायम आणि तजेलदार दिसतो. जर यानंतर तुम्हाला चेहरा तेलकट वाटत असेल तर दुसऱ्या एका कापसाच्या बोण्यात गुलाब पाण्याचे काही थेंब टाकून चेहरा नीट पुसून घ्या.