हे आहेत फायदे
१ ऑस्टियोपोरोसिस
गांजाच्या बीयांमध्ये भरपुर प्रमाणात कॅल्शिअम असल्याने हाडे मजबुत होतात. यामुळे ऑस्टियोपोरोसिसची समस्या होत नाही.
२ कँसरपासून बचाव
या बीयांमधील फिनॉलिक कंपाऊंड अँटीऑक्सीडंटसारखे काम करते. यामुळे अनेक प्रकारच्या कँसरपासून बचाव होतो. या बीयांच्या सेवनाने शरीरातील पेशी निरोगी राहतात.
३ प्रतिकार क्षमता वाढते
गांजाच्या बीयांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर आणि आरोग्यास लाभदायी ऑइल असल्याने अनेक रोगांविरुद्ध लढण्यासाठी शरीर सक्षम होते.
४ अॅनिमीया
लोहाचे प्रमाण कमी असल्यास या बीयांचे सेवन करावे. यातील लोहमुळे शरीरातील लाल पेंशीचे प्रमाण वाढते व अॅनिमियाची समस्या दुर होते.
५ वजन
यातील अधिक प्रमाणातील प्रोटीन आणि फायबमुळे दीर्घकाळ भुक लागत नाही. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते.
६ निरोगी ह्रदय
शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. ह्रदयाची क्रिया सामान्य होते. हार्ट अटॅक, ब्लडप्रेशर, कार्डियक अटॅक असे हृदयासंबंधी आजार होत नाहीत.
७ पचनक्रिया
गांजाच्या बीयांमध्ये भरपुर प्रमाणात फायबर असल्याने पोट साफ होते. गॅस, अॅसिडीटी, डायरिया, चयापचयाविषयीच्या समस्या आणि आतड्यांचा कँसर होण्याचा धोका कमी होतो.
८ मजबूत स्नायू
यातील २१ अमिनो अॅसिड स्नायूंच्या मजबुतीसाठी अतिशय महत्त्वाचे असते. शरीर हे अॅसिड निर्माण करु शकत नाही. त्यामुळे या बीयांच्या सेवनाने स्नायू मजबुत होतात.
९ निद्रानाश
या बीयांमध्ये मॅग्नेशियम असल्याने झोपेच्या समस्या दूर होतात. मॅग्नेशियममुळे शरीरात सेरोटोनिन नावाचे रसायन निर्माण होते. हे रसायन नंतर मेलाटोनिनमध्ये बदलते. आणि चांगल्या झोपेसाठी मेलाटोनिन फार आवश्यक असते.