रोज प्या २ कप ‘ब्लॅक’ कॉफी, याचे आरोग्यादायी ९ फायदे जाणून घ्या

Coffee | Have a cup of coffee every day and Grow your life and Learn the other benefits
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्याच्या दृष्टीने ब्लॅक कॉफी खूप लाभदायक आहे. यात कॅलरीचे प्रमाण खुप कमी असून कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखी पोषकतत्त्व जास्त असतात. दिवसातून दोन कप विनासाखरेची कॉफी पिणे हृदयासाठी फायदेशीर आहे. ब्लॅक कॉफी स्नायुतंत्राला व्यवस्थित ठेवते आणि मानसिक ताण कमी करते, असे तज्ज्ञ सांगतात. विशेष म्हणजे अँटीऑक्सीडेंट्सयुक्त ब्लॅक कॉफी कॅन्सरला दूर ठेवते.

हे आहेत फायदे

ब्लॅक कॉफीमध्ये अँटीकॅन्सर गुण असल्याने कोलेस्टेरॉल कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. यासोबतच हे लिव्हर कॅन्सरपासून ४० टक्के रक्षण करते.

कॉफी प्यायल्याने नकारात्मक विचार नष्ट होतात. यामुळे डिप्रेशन दूर करता येऊ शकते.

विनासाखरेची ब्लॅक टी प्यायल्याने वजन खुप लवकर कमी होते. मॅटाबॉलिज्मला ५० टक्के वाढवते. यासोबतच पोट वाढू देत नाही.

विनासाखरेची ब्लॅक कॉफी पिल्याने हृदय निरोगी राहते. कॉफी पिल्याने शरीरावरील सूजचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते.

ब्लॅक कॉफीमध्ये अँटीऑक्सीडेंट् असतात. एक कप कॉफी प्यायल्याने व्हिटॅमीन बी २, बी ३ आणि बी ५, मॅगनीज, मॅग्नीशियम आणि पोटॅशियम असते.

ब्लॅक कॉफी पिल्याने टाइप २ डायबिटीजची शक्यता कमी होते. या माध्यमातून डायबिटीज नियंत्रित करता येते.

ब्लॅक कॉफी चांगल्या स्मरणशक्तीसाठी फायदेशीर असते. यासोबतच मेंदूला सतर्क करते आणि नर्वस सिस्टम अ‍ॅक्टिव्ह राहते. कॉफी डिमेन्श म्हणजेच वेडेपणापासून दूर ठेवते.

कॉफीमधील कॅफीन सायकोअ‍ॅक्टीव्ह आहे. मेंदूला चांगले ठेवते. ऊर्जा देते आणि थकवा पुर्णपणे दूर करते.

कॉफी एक डाइयुरेटिक बेवरेज आहे. ज्याचे जास्त सेवन केल्याने सारखे लघवीला जावे लागते. विनासाखरेची ब्लॅक कॉफी प्यायल्याने टॉक्सिन्स आणि बॅक्टेरिया बाहेर निघतात. यासोबतच पोट स्वच्छ होते.