आरोग्यनामा ऑनलाइन – आपल्याकडील जुन्या रितीरिवाजानुसार आजही अनेक महिला अंडरगारमेंट्स खुल्या जागेत आणि उन्हात वाळत घालू शकत नाहीत. परंतु, अंडरगारमेंट्स चांगल्याप्रकारे वाळले नाही तर विविध आजार होऊ शकतात. महिलांनी याबाबत नेहमी काळजी घेतली पाहिजे. यामुळे कोणते नुकसान होते ते जाणून घेवूयात.
होतात हे आजार
1 खाज येणे
खराब, दमट अंडरगारमेंट्समुळे त्वचेला खाज येण्याची समस्या होते. ही खाज वेगाने पसरते.
2 किडनी स्टोन
खराब अंडरगारमेंट्समुळे किडनी स्टोन होण्याची शक्यताही असते. बॅक्टेरियामुळे हे होते. बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन झाल्यास प्रथम लिव्हर आणि किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.
3 यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन
हायजीन हे या समस्येचे प्रमुख कारण आहे. यासाठी अंडरगारमेंट्स चांगल्या प्रकारे स्वच्छ आणि सुकलेले असावे.
4 गर्भाशयात इन्फेक्शन
महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये होणारे इन्फेक्शन गर्भाशयामध्ये कोणत्याही रोगाला जन्म देऊ शकते. हे घातक ठरु शकते.
5 स्कीन इन्फेक्शन
कपडे पूर्णपणे सुकलेले नसतील, थोडे ओले असतील तर इन्फेक्शनचा धोका वाढतो. प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूची त्वचा सॉफ्ट आणि सेन्सिटीव्ह असते. त्यामुळे इथे इन्फेक्शन लवकर होते.