आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सॅनिटायझरचा एक थेंब हातांवरील किटाणू नष्ट करतो यात तथ्य नाही. सॅनिटायझरमध्ये 60 टक्के अल्कोहोल असते जे किटाणू पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पुरेसे नाही. परंतु, सॅनिटायझरचा वापर खुप वाढला आहे. हे शाळा, कॉलेज, ऑफिस येथे सर्रास वापरले जाते. काहींना सॅनिटायझरची सवय लागते. परंतु, सॅनिटायझर सतत वापरल्याने फायदे कमी आणि नुकसान जास्त होते.
हे आहेत तोटे
1 सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल कमी असल्यास ट्रायक्लोसॅनचे प्रमाण जास्त असते. यामुळे सर्दी किंवा खोकला यासारख्या समस्या अधिक होऊ शकतात.
2 हॅन्ड सॅनिटायझरचा सतत वापर त्वचेसाठी घातक आहे.
3 यातील फालेट्स हुंगल्याने किंवा कोणत्याप्रकारे शरीरात गेल्यास नुकसान होऊ शकते. याचा सर्वात जास्त प्रभाव फर्टिलिटीवर पडतो.
4 सॅनिटायझर बॅड बॅक्टेरियासोबतच गुड बॅक्टेरियाही नष्ट करतो. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ शकते.
Visit : arogyanama.com