आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लिव्हर, फुफूसे आणि हृदरोगांची समस्या असल्यास त्याचे संकेत नखांवरुन समजू शकतात. नखांची मजबूती, रंग, त्यावरील डाग हे आजाराविषयी संकेत देत असतात. निरोगी नखे ओळखता आली पाहिजेत. तसेच आजाराचे संकेत देणारी नखेही ओळखता आली पाहिजेत. यासाठीच नखांवरुन आजार कसे ओळखावे, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
दुधी पांढरा रंग
हाताच्या दहा बोटांपैकी सात ते आठ नखांवरील अर्धचंद्राचा रंग दुधी पांढरा असेल तर आरोग्य चांगले आहे.
लाल रंग
नखांवरील अर्धचंद्राचा रंग लाल असेल तर पोषकतत्वांची कमतरता आहे, असे समजावे. हा डायबिटीज, हृदयरोग, अॅनमिया या आजारांचा संकेतही असू शकतो.
लहान अर्धचंद्र
बोटांवरील अर्धचंद्र आकाराने लहान असेल तर हा रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याचा संकेत आहे. इनडायजेशनची समस्या होऊ शकते.
अंगठ्यांवरील अर्धचंद्र
दोन्ही हाताच्या केवळ अंगठ्यांवरच अर्धचंद्र असेल तर हा किडनीच्या आजराचा संकेत असू शकतो.