आरोग्यनामा ऑनलाईन टीम – योगामध्ये शरीर आणि मन तरुण करण्याची जादूई ताकद आहे. नियमितपणे योग करणे यासाठी आवश्यक आहे. यासाठी काही निवडक आसने केली तर चांगला फरक दिसून येतो. योगाचे इतरही अनेक फायदे असून यामुळे आरोग्य चांगले राहते. यौन जीवन निरोगी ठेवून तारुण्य टीकवण्यासाठी काही टीप्स आपण जाणून घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
* प्रणय करण्यापूर्वी योगा केल्याने भरपूर उर्जा शक्तीचा शरीरात संचार होतो. ही उर्जा प्रणय करताना खूप लाभदायक ठरू शकते. यामुळे मेंदू आणि मांसपेशी सक्रिय होतात. योगासन केल्यानंतर योग स्नान शरीराला ताजेपणा देतो.
* सुगंध, स्पर्श, प्रकाश आणि तेलाचा औषधीय मेळ सर्व शारीरिक आणि मानसिक विकारांना दूर करतो. यामध्ये अभ्यंगम, शिरोधारा, नास्यम, स्वेदम आणि लेपन इ. पद्धतींचा वापर केला जातो.
श्वास
जलद, दीर्घ तीव्रतेने श्वास घ्या. या प्रक्रियेत श्वास घेण्यापेक्षा सोडण्यावर भर द्या. श्वासोच्छोवासाचा हा झंजावात शरीर आणि मनाला उत्साहित करतो.
बारा आसने
निवडक बारा आसने नियमित केल्याने कोणत्याही प्रकारचा यौन रोग होत नाही. यामुळे तुमचे तारुण्य कायम राहील. पद्मासन, अर्धमत्स्येंद्रासन, सर्वांगासन, हलासन, धनुरासन, पश्चिमोत्तनासन, मयुरासन, भद्रासन, मुद्रासन, भुजंगासन, चंद्रासन आणि शीर्षासन ही ती बारा आसने आहेत.
मालिश
चेहरा थोडेसे क्रीम किंवा तेल लावून हलक्या हाताने मालिश करून घ्या. हात आणि पायाची बोटे, डोके, खांदे, कान, मांड्या आणि पोटाची मालिश करा. चांगल्याप्रकारे शरीराच्या सर्व अवयवांना हलक्या हाताने दाबा ज्यामुळे थांबलेली उर्जा मुक्त होऊन स्नायूंमध्ये पोहोचेल तसेच रक्ताचा पुन्हा संचार होईल.
आहार
अयोग्य आहारामुळे वात, पित्त आणि कफचे संतुलन बिघडते. यामुळे आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. सकस, हलके अन्न खावे. फळ आणि ताज्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खाव्यात.
हे कटाक्षाने टाळा
* थोडा कमीच आहार घ्यावा. जेवण मसालेदार, मांसाहार आणि जास्त तिखट नसावे. कडू, खारट, तिखट, चटपटीत, तळलेले, मासे, मांस, हिंग, लसुन, कांदा आणि शिळे अन्न या गोष्टींचा त्याग करावा.
* जेवणात शुद्ध तूप, रस आणि रेशे यांचे प्रमाण जास्त असावे. तांदूळ, ज्वारी, गहू, दुध, लोणी, खडीसाखर, हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवन करावे. आहार पुष्टीकारक, सुमधुर आणि पाचक असावा.