• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 18, 2019
in Yoga Day Special, योग
0
ladies-yoga

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन- महिलांना अतिशय कष्टाची कामे करावी लागत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांचे काम चालूच असते. कामाच्या गडबडीत महिलांना स्वतःकडे लक्ष दयायला अजिबात वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही महिलांचा तर असा समाज असतो. कि आपण दिवसभर एवढं काम करतो. मग त्यात किती व्यायाम होत असेल. पण ते काम म्हणजे व्यायाम अजिबात नसतो. हे महिलांनी समजून घेतले पाहिजे. महिलांना योगा करण्याची गरज ही पुरुषांपेक्षा जास्त असते. त्यामुळे महिलांनी नियमित योगा करणे गरजेचे आहे.

महिलांसाठी योगाचे काय महत्व आहे ते खालीलप्रमाणे 

१) महिलांना सर्वांशी चांगले नातेसंबंध ठेवणे गरजेचे असते. त्यांच्यामुळेच घर टिकून राहते. त्यामुळे जोडीदार, आई-वडील, मित्र किंवा तुमच्या लाडक्या व्यक्ती या सगळ्यांशी असेलेले नातेसंबंध योगामुळे सुधारतात. तणावमुक्त, आनंदी आणि समाधानी मन नात्यांसारख्या संवेदनशील संबंधात फार उपयोगी पडते.

२) दिवसभराच्या कामाच्या धावपळीमुळे संध्याकाळी गळून गेल्यासारखे वाटते. त्यामुळे तुम्ही जर रोज काही मिनिटे नियमित योगाचा सराव केला. तर तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहता.

३) तुमच्या दैनंदिन कार्यक्रमात तुम्ही जर योगाचा समावेश केलात तर शरीर सशक्त, चपळ आणि लवचिक बनेल. रोज न चुकता योगा केलात तर तुमच्या शरीराच्या स्नायूंना बळकटी येईल. तुमच्या शरीराची ठेवण सुधारेल. उभे राहताना, बसताना, झोपताना आणि चालताना त्यात एक प्रकारचा डौल येईल.

४) गर्भधारणा होण्यासाठी आणि चांगली प्रसूती होण्यासाठी महिलांना योग करणे गरजेचे आहे. प्रसूती नंतर वजन वाढते. या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगा महत्वाचा आहे.

५) मासिक पाळी संदर्भातील काही आजार असतील तर ते योगामुळे बरे होतात. त्यामुळे महिलांना योगा करणे गरजेचे आहे.

Tags: "योगाचे" महत्वarogyanamahealthimportance of yogaWomenyogaआरोग्यआरोग्यनामापुणेमहिलायोगा
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021