आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीर दणकट असल्यास आपली काम करण्याची क्षमतासुद्धा वाढते. यासाठी नियमित व्यायाम अथवा योगासने करणे खूप गरजेचे आहे. नियमितपणे व्यायाम, योगासने केल्यास शरीर तंदुरूस्त राहते. यासाठी हातापायांसह पोटाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. पोटाच्या खालच्या भागाच्या स्नायूंना खास बळकटी मिळण्यासाठी अर्धसलभासन करावे. या आसनाने कंबरही लवचीक होते.
असे करा आसन
* जमिनीवर पोटावर झोपा. दोन्ही पाय एकमेकांना चिकटलेले असावे.
* पायाची बोटे मागे आणि तळवे आकाशाकडे असले पाहिजे. हात बगलेला चिकटलेले
* थेट मागच्या बाजूला असावे. मुठी बंद ठेवा आणि कपाळ जमिनीला टेकवा.
* डोके थोडे वर उचलत हनुवटी जमिनीला टेकवा.
* उजवा पाय गुडघे न वाकवता हळूहळू वर उचला. जेवढे वर नेता येईल तेवढे घेऊन जा.
* काही वेळ या स्थितीत राहा. आता हळूहळू जुन्या स्थितीत या.
* हीच प्रक्रिया दुसऱ्या पायानेदेखील करा.