WHO ने सांगितलं एंटिबायोटिकचा वापर कसा करायचा

tablets

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – WHO ने एंटिबायोटिक टॅब्लेट्सचा वापर कसा करायचा हे समजावून सांगण्यासाठी एक अभियान सुरु केले आहे. यात भारताबरोबरच इतर सर्व सदस्य देशांना या टॅब्लेट्सच्या योग्य वापरासाठी नवीन ऑनलाईन टूल वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या टॅब्लेट्सच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात. आणि आयुष्य वाचविणाऱ्या या टॅब्लेट्सचा योग्य वापर करता यावा म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने ही पद्धत उपयोगात आणली आहे.जागतिक आरोग्य संघटनेने या टॅब्लेट्सचे वर्गीकरण केले आहे. त्यामुळे एंटिबायोटिक किती प्रभावशाली आहे. हे समजण्यास मदत होईल.

या नव्या वर्गीकरणाला उपयोगात आणण्यासाठी भारतही सहभागी झाला आहे. त्यामुळे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने जे नियम बनवले आहेत. ते भारतालाही पाळावे लागतीत. कारण या टॅब्लेट्स भारतात जास्त विकतात.एक वर्गीकरण प्रणाली लिस्टींग तयार केली आहे. त्यात सामान्य संक्रमण आणि धोक्याचं संक्रमण यासाठी कोणत्या टॅब्लेट्सचा उपयोग केला पाहिजे आणि कोणती टॅबलेट योग्य वेळी उपलब्ध असली पाहिजे. कोणत्या टॅब्लेट्सला शेवटचा उपाय म्हणून म्हणून वापरायला पाहिजे. जेणेकरून याचा प्रतिरोध कमी होईल.

जागतिक आरोग्य संघटनेचा या मागचा एवढाच हेतू आहे. असे या संघटनने सांगितले.या टॅब्लेट्सचा गर्भवती महिलांनी तसेच बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलांनी खाऊ नये. त्याचप्रमाणे ज्यांना लिव्हर आणि किडनीची समस्या आहे. त्यांच्यासाठी या टॅब्लेट्स खाणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे या लोकांनी डॉक्टरांना विचारल्याशिवाय या टॅब्लेट्स घेऊ नये. असेही या संघटनेने सांगितले आहे.